26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीय२४ तासांत ४१,५०६ नवे रुग्ण

२४ तासांत ४१,५०६ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४१ हजार ५०६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशात ४१ हजार ५२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. ३५ हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा ४५ हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशाचा सध्याचा रिकव्हरी रेट ९७.२० टक्के इतका आहे. भारताचा पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३२ टक्के इतका आहे. देशाचा सध्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. सलग विसाव्या दिवशी देशाचा दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे. देशाचा शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट २.२५ टक्के इतका होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या