24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीय२४ तासांत आढळले ४२,७७६ कोरोना रुग्ण

२४ तासांत आढळले ४२,७७६ कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला होता. दरम्यान दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र अद्यापही दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडत आहे. दररोज समोर येणारी देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही कधी कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे.

आज कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४२,७७६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १,२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४५,२५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात ३,०७,९५, ७१६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २,९९,३३,५३८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ४,०७,१४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४,५५,०३३ कोरोना बाधित रुग्ण आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या