22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये ४३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये ४३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

एकमत ऑनलाईन

सुकमा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी नऊ महिला नक्षलवाद्यांसह एकूण ४३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यातील दहा गावांतील ४३ नक्षलवादी सुकमा शहरातील वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिका-यांसमोर हजर झाले आणि आत्मसमर्पण केले, अशी माहिती सुकमाचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेअंतर्गत सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने नक्षल निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. ज्या अंतर्गत पोलिस दल सुकमाच्या अंतर्गत मोहिमेपर्यंत पोहोचून जिल्हा प्रशासनाच्या पुनर्वसन धोरणाला प्रोत्साहन देत आहे. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून द्यावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. आत्मसमर्पण केलेला एक नक्षलवादी पोडियामी लक्ष्मणवर छत्तीसगड सरकारने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे एसपी सुनील शर्मा म्हणाले की, शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांनी शासन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे वचन घेतले आहे. नक्षलवादी पोडियामी लक्ष्मणवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सध्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. तर पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकाला इतर सुविधा दिल्या जातील.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या