21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयदेशात दिवसभरात ४४ हजार २३० नवे रुग्ण

देशात दिवसभरात ४४ हजार २३० नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर आहे, पण ती कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या आत नोंदली जात आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४४ हजार २३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४२ हजार ३६० रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. गुरुवारी देशात ५५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ इतकी आहे, तर ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ नागरिकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोना मृत्यूचा आकडा ४ लाख ५ हजार १५५ वर पोहोचला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५ हजार १५५ इतकी आहे. देशातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

लवकरच कोव्हिशील्ड-कोव्हॅक्सीनची मिक्सिंग चाचणी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या