नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. असे असले तरी गेल्या २४ तासांत देशात ४४,६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२० लोकांनी यात आपले आपले प्राण गमावले आहेत. जगात सर्वाधिक वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या एकूण ८७ लाख ७३ हजार झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २९ हजार १८८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीनुसार, आज देशात ४ लाख ८० हजार इतके कोरोनाचे अॅक्टिव रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. चांगली बातमी अशी आहे, की आतापर्यंत एकूण ८१ लाख ६३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामधून ४७ हजार ९९२ रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रासह ५ राज्यांत रिकव्हरी रेट वाढला
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचे अॅक्टिव रुग्ण, मृत्यू दर आणि रिकवरी रेटचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह, भारतात रिकव्हरी रेट देखील सतत वाढत आहे.
आता शिवाजी पार्क नव्हे ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’