24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयसीबीआयच्या ताब्यातील ४५ कोटींचे सोने गायब

सीबीआयच्या ताब्यातील ४५ कोटींचे सोने गायब

१०३ किलो सोने भरले कमी

एकमत ऑनलाईन

चेन्नई : ज्या चौकशी समितीच्या नावाने अनेकजण थरथर कापतात. ज्या संस्थेचा वापर केंद्र सरकार तिच्या फायद्यासाठी आणि विरोधकांना धमकावण्यासाठी करते, असा आरोप नेहमी केला जातो आणि जी संस्था देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे, असे म्हटले जाते, तीच सीबीआय आता चौकशीच्या फे-यात अडकली आहे. याला सीबीआयच्या ताब्यातल्या सोन्याची चोरी हे कारणे ठरले आहे. हे प्रकरण ५-१० तोळे सोन्याच्या चोरीचे नाही, तर तब्बल १०३ किलो सोन्याच्या चोरीचे आहे. या सोन्याची बाजारातील किंमत तब्बल ४५ कोटी रुपये आहे.

सीबीआयने २०१२ मध्ये तामिळनाडूतल्या सुराणा कॉर्पोरेशनवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये सीबीआयने तब्बल ४०० किलो सोने जप्त केले होते़ तेव्हापासून हे सोने सीबीआयच्या ताब्यात होते़ मात्र, आता या सोन्याचे पुन्हा एकदा वजन करण्यात आले. या वजनात तब्बल १०३ किलो सोने कमी भरले गेले. त्यानंतर या सर्व प्रकार समोर आला.

प्रकरण न्यायालयात
सीबीआयच्या ताब्यातील सोने गायब झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. यानंतर आता कोर्टाने चक्क सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र देशातील सर्वोच्च यंत्रणेची चौकशी कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राज्य सरकारच्या चौकशीवर सीबीआयचा आक्षेप
तर ही चौकशी आता चक्क सीबी-सीआयडी म्हणजेच राज्य सरकारचा गुन्हे अन्वेशन विभाग करणार आहे. सीबीआयने या चौकशीला विरोध केला आहे. मात्र कोर्टाने कडक शब्दात फटकारले आहे. तसेच ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिका-याच्या अखत्यारित सीआयडीद्वारे केली जाईल, असे सांगितले आहे़ विशेष म्हणजे ही चौकशी ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

सीबीआयची चौकशी; देशातील पहिलीच घटना
सीबीआयची चौकशी होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असेल. मात्र या घटनेमुळे देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उपस्थित झाले आहे. आता चौकशीत काय समोर येते? यातून या प्रकरणाचा उलगडा कसा होतो? आणि खरा गुन्हेगार कोण? या सर्व प्रकरणाची उत्तरे लवकरच समोर येतील.

मैनपुरीत सैराटची पुनरावृत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या