22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयदेशात दररोज होतात ४५० आत्महत्या

देशात दररोज होतात ४५० आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील आत्महत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०२१ मध्ये देशभरात १.६४ लाखांहून अधिक लोकांनी स्वतःचा जीव घेतला. हा आकडा २०२० च्या तुलनेत ७.२ टक्के अधिक आहे. २०२० मध्ये १.५३ लाख लोकांनी आत्महत्या केल्या होत्या असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात म्हटले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जगात दरवर्षी सात लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते १५ ते २९ वयोगटातील युवकांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आहे. भारतातच आत्महत्यांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे.

गेल्यावर्षी १ लाख ६४ हजार ३३ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणजेच दररोज ४५० मृत्यू आत्महत्यांमुळे होत होते. एनसीआरबीनुसार २०१७ मध्ये १.२९ लाख लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच २०१७ ते २०२१ पर्यंत आत्महत्यांच्या संख्येत २६ टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण वेगळे असते. नैराश्य, तणावामुळे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी वैद्यकीय कारण देखील असते. याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा तो आत्महत्या करतो.

एनसीआरबीने अहवालात आत्महत्येचे कारण सांगितले आहे. त्यानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारांमुळे लोक सर्वाधिक आत्महत्या करतात. गेल्या वर्षी ३३ टक्के आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे आणि १९ टक्के आजारपणामुळे झाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या