28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयजुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज

जुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाख डोसची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत ३ कोटी लोकांना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले आहेत. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण अभियानांतर्गत दररोज २.८ लाख लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत. केंद्र सरकारने जुलै महिन्यापर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जुलैचे लक्ष्य गाठण्यासाठी रोज ४८ लाखापून अधिक लोकांना लस द्यावी लागणार आहे.

लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढील ८४ दिवसांत २७ कोटी लोकांना लसींचे दोन्ही डोस द्यावे लागतील. यासाठी सरकारला दररोज २४.३४ लाख लोकांना लसींचे दोन्ही डोस देण्याची गरज आहे. हा आकडा सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या आठपट आहे. पण मागील काही दिवसांपासून भारतात लसीकरणाचा वेग मंदावला आहे आणि आता जुलैचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी दररोज ४८.७ लाख लोकांचे लसीकरण करण्याची गरज आहे. पण कोविन डॅशबोर्डनुसार मे महिन्याच्या सुरुवातीच्या ४ दिवसांत फक्त ५० लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.

सध्या व्हॅक्सीन घेणा-यांची संख्या कमी आहे, असे नाही. पण सरकारच्या खराब प्लॅनिंगमुळे लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. याच कारणामुळे एकीकडे लस उपलब्ध नाही आणि दुसरीकडे लस घेणा-यांची संख्या वाढत आहे. भारतात जेव्हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा फक्त फ्रंटलाईन कर्मचा-यांना लस दिली जात होती. मार्चपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या गंभीर रुग्णांना यात सामील करण्यात आले. एका महिन्यानंतर ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना यात सामील करण्यात आले. आता १ मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांनाच यात सामील करण्यात आले आहे. यामुळे लस घेणा-यांची संख्या ११० कोटी झाली आहे.

लोकसंख्येच्या १० टक्के लोकांनाच पहिला डोस
भारताच्या लोकसंख्येच्या फक्त १० टक्के लोकांनाच लसीचा पहिला डोस आणि २ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. भारताला हर्ड इम्युनिटी हवी असेल, तर १८ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक ५ पैकी ३ लस द्यावी लागेल. म्हणजे भारताला अजून ११० कोटी लसींची आवश्यकता आहे. या आठवड्यात केंद्र सरकारने २ मेपर्यंत राज्यांकडे ७८ लाख लस आहेत आणि ५६ लाख लस पुढील तीन दिवसात दिल्या जातील. सरकारकडून १.२४ कोटी कोवीशील्ड आणि १.१२ कोटी कोव्हॅक्सिनची ऑर्डर देण्यात आली आहे. या व्हॅक्सीनदेखील फक्त १६ दिवस चालतील. यामुळे जुलै महिन्याचे लक्ष्य गाठण्यासाठी दररोज ४८ लाख लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे.

लस कधी उपलब्ध होणार?
२८ एप्रिलला केंद्र सरकारने कोवीशील्डचे ११ कोटी आणि कोव्हॅक्सिनच्या ५ कोटी डोसची ऑर्डिर दिली होती. पण याची डिलीव्हरी मे, जून आणि जुलैमध्ये होणार आहे. लस निर्मितीच्या बाबतीत भारत सर्वात मोठा देश आहे. भारतात एका महिन्यात ७-८ कोटी लस तयार केल्या जातात. सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दरमहा कोवीशील्डच्या ६-७ कोटी डोस तयार करत आहे, तर भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे १ कोटी डोस तयार करत आहे.

अन्य लसींचे काय?
रशियाच्या स्पुटनिक लसीला भारतात वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतर रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडने भारतातील ६ कंपन्यांसोबत लस निर्मितीचा करार केला आहे. या कंपन्या सोबत मिळून ८५ कोटी डोस तयार करणार आहेत. कंपन्यांनी सांगितले की, जुलैपासून स्पुटनिक लसीचे वितरण सुरू होईल. भारतात स्पुटनिकची निर्मिती डॉ. रेड्डीज करत आहे. ज्या लसींना जगात वापराची परवानगी मिळाली आहे. त्या सर्व लसींना भारत सरकारने भारतात वापरण्यासाठी मंजुरी दिली आहे. यात फाइजर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना सामील आहेत.

राज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या