24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये विषारी दारूचे ४९ बळी

पंजाबमध्ये विषारी दारूचे ४९ बळी

एकमत ऑनलाईन

चंदीगड : पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरणतारण या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिल्याने आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अगोदर ७ जणांचा मृत्यू झाला होता. आज ४२ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी पोलिसांनी विषारी दारू तयार करणा-या काही लोकांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिले.

दरम्यान, तरसिक्क पोलिस ठाण्याच्या एसएचओला निलंबित केले आहे. याशिवाय या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, वीरवारमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांवर पोलिसांना माहिती न देता अंत्यसंस्कार केले. पंजाबमध्ये अवैध दारूविक्रीवरून राजकारण सुरू होते. त्यातच शुक्रवारी सीमा भागातील तरणतारण, अमृतसर आणि गुरुदासपूर या जिल्ह्यात तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला.

यात सर्वाधिक ३० बळी तरणतारण जिल्ह्यात गेले आहेत आणि काल ७ जणांचा बळी गेल्याने आता मृतांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. दोन दिवसांत तीन जिल्ह्यातील १० गावे आणि दोन शहरातील हे मृत व्यक्ती आहेत. यातील बहुतांश मजूर आहेत. यात अत्यवस्थ असलेल्या आणखी काही लोकांची प्रकृती गंभीर आहे.

Read More  देशात ५५ हजारांवर वाढले रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या