22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयन्यायालयीन भरती रखडल्यानेच देशात ५ कोटी प्रकरणे प्रलंबित : सरन्यायाधीश रमना

न्यायालयीन भरती रखडल्यानेच देशात ५ कोटी प्रकरणे प्रलंबित : सरन्यायाधीश रमना

एकमत ऑनलाईन

जयपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची १८ वी बैठक राजस्थानातील जयपूर येथे पार पडली आहे. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशात ५ कोटी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी देशभरात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे कारण सांगितले आहे.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या क्रायक्रमाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात देशभरातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर न्यायालयीन भरती न केल्याच्या कारणावरून देशभरात पाच कोटी प्रकरणे प्रलंबित असल्याचे सरन्यायाधीश रमना यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर सरकारला लवकरात लवकर न्यायालयीन भरती घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या प्रकरणाला उत्तर देण्याची जबाबदारी ही कायदा मंत्र्यांची असल्याचं रमना यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लोकांना न्याय देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात चांगला समन्वय पाहिजे असं मत रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. मला आनंद आहे की त्यांनी प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उचलला आहे. आपण जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा आपल्यालाही हाच प्रश्न पडतो की किती वर्षे खटला चालणार? प्रलंबित प्रकरणाचे कारणे तुम्हा सर्वांना माहीत आहेत.

मला ते विस्ताराने सांगण्याची गरज नाही. गेल्या सरन्यायाधीश-मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतही मी हे आधीच सूचित केले होते. रिक्त पदे न भरल्यामुळेचे देशभरात इतके प्रकरणे प्रलंबित राहिले आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. असे रमना म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या