26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयदेशात आता ५-जी सेवा

देशात आता ५-जी सेवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आजपासून ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन निविदा प्रक्रिया सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली असून ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कने ५ जी टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.

लिलावाचे दिवस किती असतील हे रेडियो व्हेव्सची खरी मागणी आणि वैयक्तिक बोली लावण्याच्या धोरणावर अवलंबून असेल. लिलावादरम्यान ४.३ लाख कोटी रुपयांचे एकूण ७२ जीएचझेड स्पेक्ट्रम ब्लॉकवर ठेवण्यात आले. याची वैधता ही २० वर्षे असणार आहे.
५-जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्सने बयाणा ठेवी जमा केल्या. त्यानंतर आज त्यांनी लिलावात सहभाग नोंदवला. भारती एअरटेलच्या २.५ पट आणि व्होडाफोन आयडियापेक्षा ६.३ पट अधिक ठेवी ठेवल्यावरून रिलायन्सचा हेतू स्पष्ट होतो. अदानी डेटा नेटवर्क्सने जमा केलेल्या रकमेपेक्षा रिलायन्सची रक्कम १४० पट जास्त आहे.

टेलिकॉम विभागाच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या पूर्व-पात्र बोलीदारांच्या यादीनुसार व्होडाफोन, आयडियाने २,२०० कोटी रुपये, भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, अदानी डेटा नेटवर्क्सने १०० कोटी रुपये, रिलायन्स जिओने १४००० कोटी रुपये जमा केले होते. चार बोलीदारांमध्ये रिलायन्सची ईएमजी रक्कम सर्वाधिक होती. सामान्यत: ईएमडी रक्कम ही लिलावात उतरलेल्या कंपन्यांची भूक, रणनीती आणि स्पेक्ट्रम घेण्याच्या योजनेचे संकेत देते.

४-जीपेक्षा १० पट वेग वाढणार
५-जी स्पेक्ट्रमचा लिलाव लो फ्रिक्वेन्सी बँड, मीडियम आणि हाय बँडमध्ये झाला. या लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे ५ जी सेवा देऊ शकणार आहे. सध्याच्या ४-जी सेवेपेक्षा ही १० पट वेगवान असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या