18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीय२१ बँकांच्या ठेवीदारांना ५ लाखांचे विमा कवच

२१ बँकांच्या ठेवीदारांना ५ लाखांचे विमा कवच

एकमत ऑनलाईन

मुंबई : पीएमसी बँकेसह २१ अयशस्वी सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता डिपॉझिट इन्शुरन्स आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ५ लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट इन्शुरन्स कव्हर दिले जाईल. कपोल सहकारी बँक, रुपया सहकारी बँक आणि इतर अनेक सहकारी बँकांना ४५ दिवसांच्या ठेवीदारांचे दावे जमा करण्यास सांगितले आहे.

डीआयसीजीसी संशोधन अधिनियम, २०२१ डीआयसीजीसी अधिनियम १९६१ अंतर्गत विमाधारक बँकांसाठी १ सप्टेंबर २०२१ पासून लागू झाला. त्यानुसार डीआयसीजीसी विमाधारक बँकांच्या ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत देईल. डीआयसीजीसीने एका निवेदनात ठेवीदारांकडून ठेवी विम्याचा दावा करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज ४५ दिवसांच्या आत सादर करण्याच्या आवश्यक सूचना या बँकांना देण्यात आल्या आहेत. बँकांनी दिलेली यादी डीआयसीजीसीद्वारे पुढील ४५ दिवसांच्या आत पडताळणी आणि सेटलमेंट केली जाईल, असे म्हटले आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत

नवे क्लेम सादर करा
बँकांना १५ ऑक्टोबरपर्यंत नवीन क्लेम सादर करण्यास आणि २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुद्दल रक्कम आणि व्याजासह स्थिती अपडेट करण्यास सांगितले आहे. ठेवीदार त्यांच्या बँकांशी संपर्क साधू शकतात आणि दावे सादर करू शकतात. तसेच बँकेला आवश्यक असल्यास इतर आवश्यक कागदपत्रे/माहिती अपडेट करू शकतात. जेणेकरून १५ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या दाव्यांवर बँकेद्वारे प्रक्रिया केली जाईल, असे डीआयसीजीसीने म्हटले आहे.

या बँकांचा समावेश
अदूर सहकारी नागरी बँक (केरळ), बिदर महिला अर्बन कोऑप. बँक (कर्नाटक), सिटी सहकारी बँक (महाराष्ट्र), हिंदू सहकारी बँक, पठाणकोट (पंजाब), कपोल सहकारी बँक (महाराष्ट्र), मराठा सहकारी बँक (महाराष्ट्र), मिलठ सहकारी बँक (कर्नाटक), नीड्स ऑफ लाईफ को ऑपरेटिव्ह बँक (महाराष्ट्र), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (महाराष्ट्र), पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक , कानपूर (उत्तर प्रदेश), पीएमसी बँक (महाराष्ट्र), रुपे सहकारी बँक (महाराष्ट्र), श्री आनंद सहकारी. बँक, पुणे (महाराष्ट्र), सीकर अर्बन को ऑप. बँक (राजस्थान), श्री गुरुराघवेंद्र सहकारी बँक (कर्नाटक), द मुधोल सहकारी बँक (कर्नाटक), मंठा नागरी सहकारी बँक (कर्नाटक), सर्जेरादादा नाईक शिराळा सहकारी बँक (महाराष्ट्र), इंडिपेन्डन्स सहकारी बँक, नाशिक (महाराष्ट्र), डेक्कन अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, विजयपूर (कर्नाटक), गढ़ा सहकारी बँक, गुना (मध्य प्रदेश) आदींचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या