18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयपतंजलीच्या ५ औषधांवर बंदी!

पतंजलीच्या ५ औषधांवर बंदी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातून अनेक प्रकारची औषधं तयार केली जातात. औषधांतून आयुर्वेदिक उत्पादनंही घेतली जातात. मात्र, बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला मोठा धक्का बसला आहे. पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणानं दिले आहेत.

आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला पाच औषधांचं उत्पादन थांबवण्यास सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीनं औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचं उत्पादन केले जात होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या