24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयअपघातात ३ सख्ख्या भावासह ५ जण ठार

अपघातात ३ सख्ख्या भावासह ५ जण ठार

एकमत ऑनलाईन

भरतपूर : भरतपूर जिल्ह्यात नवीन गाडी घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेल्या ३ सख्ख्या भावांसह ५ तरुणांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. कार आणि बोलेरोच्या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून यातील एका तरुणाचा ८ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. अपघाताचे वृत्त समजताच मृतांच्या घरात खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या अपघातात तरुणांच्या कारला धडकलेल्या बोलेरो गाडीतील ४ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यामधील पहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील बारखेडा गावात काल रात्री ही वेदनादायक दुर्घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या