चेन्नई : सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या ५ पोलिसांची बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-यांमध्ये एका विशेष सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. तमिळनाडूतील मायिलादुथुराई येथील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.
नागपट्टिनम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जवागर यांनी विशेष सहाय्यक निरीक्षक सुब्रमण्यम यांच्यासह रेणुका, अश्विनी, नित्यशिला आणि शिवनेसन या पाच पोलीस कर्मचा-यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. हे सर्वजण सध्या सेम्बनारकोविल पोलीस ठाण्यात कार्यरत होते.