32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीय५ राज्यातील निवडणुकीचा वाजला बिगुल

५ राज्यातील निवडणुकीचा वाजला बिगुल

एकमत ऑनलाईन

दिल्ली : पश्चिम बंगालसह तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत ही निवडणूक होणार असून, २ मे रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.

पाचही राज्यांत भाजपची परीक्षा
दिल्लीच्या सीमांवर तीन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरची वाढती महागाई, पुन्हा वाढलेला कोरोना संसर्ग या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ही भाजपसाठी परीक्षाच असणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या दीड वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू केला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आसाममध्ये २०१६ ला भाजपने आसाम गण परिषद आणि बोडोलँड पिपल्स प्रंटबरोबर आघाडी करून निवडणूक लढविली. ‘एनडीए’ला १२६ पैकी ८६ जागा मिळाल्या.

दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत भाजपला अद्याप शिरकाव करता आलेला नाही. २०१६ ला अण्णाद्रमुकने २३४ पैकी तब्बल १५०जागा जिंपून सत्ता मिळविली होती. तामिळनाडूच्या राजकारणात अण्णा द्रमुक किंवा द्रमुक या दोन पक्षांचीच अनेक वर्षांपासून सत्ता आहे. यावेळी निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे अण्णा द्रमुकच्या जयललीता आणि द्रमुकचे करूणानिधी हे दोन बडे नेते हय़ात नाहीत.

केरळमध्ये आतापर्यंत माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१६ ला १४० पैकी ९१ जागा जिंकून माकपचे पी. विजयन मुख्यमंत्री बनले होते. भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या