पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरात सुरु केली आहे. जागावाटपाचे गु-हाळ इतके चालू होते; मात्र आता ते संपले आहे. शनिवारी संपुआचे जागावाटप ठरल्यानंतर रविवारी रालोआनेही जागावाटप नक्की केले आहे. सत्ताधारी रालोआतील प्रमुख घटक पक्ष संयुक्त जनता दल १२२ जागा लढविणार असून, भाजपाला १२१ जागा (५०-५०) सोडण्यात आल्या आहेत.
संजद लढविणार असलेल्या १२२ जागांमधील पाच ते सात जागा या जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम पार्टीला देणार आहे. तर भाजपा आपल्या कोट्यातून रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला काही जागा देणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार लोजपाला भाजपा १५ जागा देणार असून, लोजपा मात्र ४२ जागांवर अडून बसली होती. अखेर संध्याकाळी लोजपाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
जागा वाटपाबाबत संजद आणि भाजपा यांच्यामध्ये पाटण्यात चर्चेची अंतिम बैठक पार पडली आहे. चार तास सुरु असलेल्या या बैठकीत संजदचे वरिष्ठ चार पदाधिकारी लल्लन सिंह, आरसीपी सिंह, विजय चौधरी आणि विजेंदर यादव हे उपस्थित होते. भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची भाजपाची बाजू मांडली.
तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
दुसरीकडे संपुआच्या वतीने जगावाटप पुर्ण झाले असून, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा