20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयराम मंदिराचे ५० टक्के काम पूर्ण : योगी

राम मंदिराचे ५० टक्के काम पूर्ण : योगी

एकमत ऑनलाईन

अयोध्या : संपूर्ण जगातील हिंदूंसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झालेल्या अयोध्या येथील राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २०२० मध्ये सुरू झालेले मंदिराचे काम २०२४च्या शेवटापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पावनधाम पंचखंड पीठाच्या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ जयपूर येथे असता राम मंदिराच्या कामाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले श्रीराम जन्मभूमी आंदोलन १९४९ पासून सुरू झाले. १९८३ मध्ये रामजन्मभूमी समिती स्थापन झाल्यानंतर आंदोलन पुढे सरकले. संपूर्ण देशभरात या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात संत, महतांनी धार दिली.

त्यानंतर अयोध्या हीच प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी असल्याचे शिक्का मोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केले. त्यानंतर २०२० मध्ये राम मंदिराची पहिली शिला रचण्यात आली. त्याचे काम आता ५० टक्के पूर्ण झाले आहे. राम मंदिरा सोबतच श्री पंचखंड पीठाने देशाच्या कल्याणासाठी विविध चळवळींमध्ये जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या