28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

कुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढते आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, कोरोनामुळे होणा-या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने १८ मे रोजी महत्वपूर्ण घोषणा केली आहे़

कोरोनामुळे जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांना कोरोनामध्ये गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

काय आहे घोषणा?
प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. त्यासोबतच, ज्या कुटुंबांमध्ये कमावत्या व्यक्तीचे निधन झालं आहे, त्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदतनिधीसोबतच महिना २५०० रुपये पेन्शन २५ वर्षे देण्यात येणार आहेत़ यामध्ये जर पतीचे निधन झाले असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचे निधन झाले असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. जर एखाद्या अविवाहित व्यक्तीचे निधन झाले तर ही पेन्शन पालकांना मिळणार आहे़

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या