बंगळूरु : केंद्र सरकारने ८३ तेजस मार्क १ ए विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशात ५० हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे. माजी सैनिक दिनानिमित्त बंगळुरुतील कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी सैनिकांसाठी दरवर्षी काहीतरी नवे करण्याचा आमचा प्रयत्न असून सरकारने घेतलेले वन रॅक वन पेन्शन सारखे निर्णय हे त्याचेच द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सैनिक वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर या उक्तीप्रमाणे आयुष्यभर देशहितासाठी लढत राहतात, असा गौरवोल्लेखही त्यांनी केला.
कृषि कायदाविषयी समितीला स्थापनेनंतर लगेच धक्का