22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयदिल्ली सरकारकडून शेतक-यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत

दिल्ली सरकारकडून शेतक-यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने राजधानीतील शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी राज्य सरकारने शेतक-यांना प्रति हेक्टर ५०,००० मदत देण्याची घोषणा केली आहे. हा आकडा महाराष्ट्रातील शेतक-यांपेक्षा चौपटीने जास्त आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना याचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रातही मदत जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील जिरायती शेतजमीनीसाठी हेक्टरी १० हजार तर, बागायतीसाठी हेक्टरी १५ हजारांची मदत सरकारने जाहीर केली आहे.

राजधानीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी ही घोषणा केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी दु: खी आहेत, दु: खी होऊ नका, असे केजरीवाल म्हणाले. नेहमीप्रमाणे सरकार तुमच्या पाठीशी आहे. मी आदेश जारी केले आहेत की ज्या शेतक-यांची पिके गमावली आहेत त्यांना प्रति हेक्टर ५०,००० रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि जिल्हा दंडाधिकारी (डीएम) सर्वेक्षण करत आहेत. ही प्रकिया दोन आठवड्यांंच्या आत पूर्ण केली जाईल. त्यानंतर शेतक-यांना थेट बँक खात्यात दोन महिन्यांच्या आत भरपाई मिळेल, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या