27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ५५५४ नवे कोरोनाबाधित

देशात ५५५४ नवे कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या सणासुदीचे वातावरण आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. यानंतर काही दिवसांनंतरच नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे. देशातील कोरोनाचा आलेख घसरला आहे.

गेल्या २४ तासांत ५५५४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत ५३९ रुग्णांची घट झाली आहे. तर कोरोनाबळीही घटले आहेत. देशात गुरुवारी दिवसभरात ६०९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच यंदा दोन वर्षानंतर मोठ्या थाटामाटात पार पडला. कोरोनाचा आलेख असाच घटता राहिल्यास यंदाचा नवरात्रौत्सवही उत्साहात पार पडण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या