22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीय५९ लाखांवर खटले हायकोर्टांत प्रलंबित

५९ लाखांवर खटले हायकोर्टांत प्रलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उच्च न्यायालयांत २२ जुलैपर्यंत ५९ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असल्याची माहिती कायदामंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती देण्यात आली. तसेच विविध न्यायालयांमध्ये काम करणा-या महिला न्यायाधीशांबद्दलचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

देशभरातील २५ उच्च न्यायालयांत ५९ लाख ५७ हजार ४५४ खटले प्रलंबित आहेत. सर्वाधिक म्हणजे १० लाखांहूनही अधिक खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या खालोखाल राजस्थान आणि मुंबई उच्च न्यायालयात ६ लाखांच्या वर खटले प्रलंबित आहेत. याबद्दल बोलताना रिजीजू म्हणाले की, केंद्र सरकार संविधानाच्या कलम २१ च्या अंतर्गत खटले लवकरात लवकर सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. न्यायालयात प्रलंबित खटले लवकरात लवकर सुटावेत, यासाठी सरकारने काही नव्या संकल्पनांचा वापरही केला आहे. व्हर्चुअल कोर्ट, व्हीडीओ कÞॉन्फरन्सिंग, अशा काही उपायांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

सध्या एकूण कार्यरत महिला न्यायाधीशांच्या संख्येबाबत माहिती देताना रिजीजू यांनी सांगितले की, सध्या सर्वोच्च न्यायालयात ३४ पैकी ४ महिला न्यायाधीश आहेत, तर विविध उच्च न्यायालयांमध्ये १,१०८ पैकी ९६ महिला न्यायाधीश कार्यरत आहेत.

सर्वाधिक महिला न्यायाधीश दिल्ली, मद्रास हाटकोर्टात
सर्वाधिक म्हणजे १२ महिला न्यायाधीश दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयांत आहेत. तेलंगणा ९, मुंबई ८ तर कोलकाता, पंजाब आणि हरियाणात प्रत्येकी ७ महिला न्यायाधीश कार्यरत आहेत. मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, पाटणा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयात एकही महिला न्यायाधीश कार्यरत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या