22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय१२ ऑक्टोबरपासून देशात ५ जी सेवा सुरू होणार

१२ ऑक्टोबरपासून देशात ५ जी सेवा सुरू होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नुकताच ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारने दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला आहे. लिलावानंतर ५जी सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतच उत्तर दिले आहे. देशभरात १२ ऑक्टोबरपर्यंत ५ जी सेवा सुरु करण्यात येणार आहे असे अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. ५ जी सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्याने विस्तार करण्यात येणार आहे असेही वैष्णव म्हणाले.

पुढील दोन ते तीन वर्षांमद्ये देशभरात ५जी सेवा पोहचण्याचे आमचे ध्येय आहे. ५ जी सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत असेही अश्विनी वैष्णव म्हणाले. ५ जी सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत ५ जी सेवा सुरु होईल असा अंदाज आहे. त्यानंतर टप्याटप्याने शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ५जी सेवाचा विस्तार करण्यात येईल. ५ जी सेवा सर्वसामान्यांनाही परवडणा-या किमतीमध्ये असेल याची काळजी घेणार आहोत असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या