नवी दिल्ली : जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले असून दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर चान्सलर स्कोल्झ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली.
स्कोल्झ यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान ६ पारंपारिक पाणबुड्या संयुक्तपणे बांधण्यासाठी ५.२ बिलियन डॉलरचा करार झाला असून यावर दोन्ही नेते स्वाक्ष-या झाल्या आहेत. सन २०११ मध्ये, दोन्ही देशांदरम्यान इंटर-गव्हर्नमेंटल कंसल्टेशनला सुरूवात झाली. यानंतर प्रथमच जर्मन चान्सलर भारतात आले आहेत. स्कोल्झ यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ आहे. २६ फेब्रुवारीला ते बंगळुरूला जाणार आहेत.
६ व्या आंतर-सरकारी सल्लामसलतीवर चर्चा
स्कोल्झ यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांना ६ व्या आंतर-सरकारी सल्लामसलतच्या निकालावर चर्चा करण्याची संधी मिळेल. तसेच या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होईल. याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातही दोन्ही देश आपले संबंध अधिक दृढ करू शकतील.