23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय  हरियाणात एकाच कुटुंबातील ६ जण ठार

  हरियाणात एकाच कुटुंबातील ६ जण ठार

एकमत ऑनलाईन

हरियाणा : हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा जण ठार तर सुमारे १७ जण जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

हरियाणातील जिंदमध्ये एक मोठी वेदनादायक दुर्घटना घडली आहे. ट्रक आणि पिकअपची धडक होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर अस्थिकलशाचे विसर्जन करून सर्वजण हरिद्वारहून परतत होते. चालक झोपेत गाडी चालवत असल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.

जिंद-चंदीगड रस्त्यावरील कंडेला गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की आजूबाजूच्या गावातही आवाज ऐकू आला. हे सर्वजण हिसार जिल्ह्यातील नारनौंद गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींनी सांगितले की, हिस्सार जिल्ह्यातील नारनौड गावातील रहिवासी प्यारे लाल यांचा नुकताच मृत्यू झाला होता. सोमवारी कुटुंबीय पिकअप वाहनाने अस्थिकलश विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. मंगळवारी सकाळी हरिद्वारहून नारायणला परतत असताना कंडेला गावाजवळ जींदहून कैथलकडे जाणा-या ट्रकला पिकअपची धडक बसली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या