26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात होणार ६ नवे हाय-टेक शहरे

कर्नाटकात होणार ६ नवे हाय-टेक शहरे

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : कर्नाटकात लवकरच सहा नवीन हाय-टेक शहरे आणि एक स्टार्टअप पार्कचे निर्माण करणार आहे, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी बंगळुरू येथे केली. बोम्मई म्हणाले, कर्नाटकातील कलबुर्गी, म्हैसूर, मंगळुरु, हुबळी-धारवाड आणि बंगळुरूजवळ सहा हायटेक शहरे बांधली जातील.

बंंगळुरू जवळचे शहर विमानतळाच्या अगदी जवळ असेल आणि ते सुनियोजित असेल, तसेच सर्वोत्तम विद्यापीठे आणि आर अ‍ॅन्ड डी केंद्रे असतील असे बोम्मई म्हणाले. नवीन शहरांचा सविस्तर आराखडा सहा महिन्यांत समोर येईल, बोम्मई यांनी आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, स्टार्टअप पार्क एक मल्टी-मॉडल असेल, जो विविध क्षेत्रांतील नवोदित उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल.

देशाच्या विकासात कर्नाटकचे मोठे योगदान
मागील आठवड्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा कर्नाटक दौ-यावर होते, त्यावेळी त्यांनी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि म्हणाले की, देशाच्या विकासात कर्नाटकचे मोठे योगदान आहे. भारताची ओळख जगभरात स्टार्टअप म्हणून होत आहे, ज्यामध्ये भारताची ही ओळख मजबूत करण्यात बंंगळुरूचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले, स्टार्टअप म्हणजे केवळ कंपनी नसते. स्टार्टअप हा विश्वास आहे, देशासमोरील प्रत्येक आव्हान सोडवणे हे देखील गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या