22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयजमिनीत सापडला ६० लाखांचा हिरा

जमिनीत सापडला ६० लाखांचा हिरा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोणाचे नशीब हे कधी आणि कसे फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. एका गरीब शेतक-याचे नशीब फळफळले आहे. २०० रुपये भाडयावर घेतलेल्या जमिनीत शेतक-याला तब्बल ६० लाखांचा हिरा सापडला आहे. लखन यादव असे हिरा सापडलेल्या शेतक-यांचे नाव आहे.

लखन यादव या शेतक-याने पन्नामध्ये २०० रुपये भाडयावर १० बाय १० जमिनीचा एक छोटा तुकडा घेतला होता. तिथे खोदकाम करताना त्याला १४.९८ कॅरेटचा हिरा सापडला आहे. खाणीत सापडलेला हिरा लिलावामध्ये ६०.६ लाख रुपयांना विकला गेला आहे. हि-यामुळे माझे आयुष्य बदलून गेले. हिरा सापडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही, असे लखन यादव याने म्हटले आहे.

पन्ना जिल्हा हि-यांसाठी प्रसिद्ध
लखनने मिळालेल्या पैशातून आपल्या चार मुलांना चांगले शिक्षण देण्याचा विचार केला आहे. माझे शिक्षण झालेले नाही. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हि-यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.

क्षणातच मजूर झाले मालामाल
हि-याच्या खाणीत काम करणा-या दोन मजुरांना काही दिवसांपूर्वी मौल्यवान हिरे सापडले होते. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून ७.४४ कॅरेटचा हिरा मिळाला़ तर लखन यादव यांना १४.९८ कॅरेटचा एक हिरा मिळाला होता. पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले आहे. हि-याची योग्य किंमत अधिका-यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार ७.४४ कॅरेटचा हिरा सुमारे ३० लाख रुपये असू शकतो तर १४.९८ कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हि-यांचा लिलाव होणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले होते.

आंदोलकांकरिता मुस्लिम तरुणांनी सुरू केली लंगर सेवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या