34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeराष्ट्रीयरद्दी विक्रीतून मिळाले ६२ कोटी

रद्दी विक्रीतून मिळाले ६२ कोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या टर्ममध्येच स्वच्छ भारत मोहीम राबवली. त्यातून नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता केंद्र सरकारने स्वच्छचा मोहीम राबवली असून जवळपास ६,१५४ कार्यालयांची स्वच्छता केली असून त्यातून जमा झालेल्या रद्दीची विक्री केली आहे. या रद्दीच्या विक्रीतून केंद्राला तब्बल ६२.५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच यामुळे व्यापलेली १२.०१ लाख चौरस फूट जागाही मोकळी झाली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लोकसभेत माहिती दिली.

केंद्रीय मंत्रालये, विभागांमध्ये आणि त्यांच्या संलग्न कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे, यासाठी केंद्र सरकारने २ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती. या मोहिमेत केंद्र सरकारच्या ६१५४ हून अधिक कार्यालयांनी भाग घेतल्याचे घेतला. यामुळे केंद्र सरकारच्या या ६१५४ कार्यालयांमधील सुमारे १२.०१ लाख चौरस फूट जागा रिकामी करून स्वच्छ करण्यात आली. महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान रद्दी आणि भंगार सामानाची विल्हेवाट लावून ६२.५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. त्यात मोकळी झालेली जागा आता उपाहार गृह, ग्रंथालये, परिषद, बैठकांसाठी सभागृह, निरामय केंद्रे आणि पार्किंग अशा विविध कारणांसाठी उपयोगी आणण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या