27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात कोरोनाचे ६२९८ नवीन रुग्ण

देशात कोरोनाचे ६२९८ नवीन रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६ हजार २९८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्या आधीच्या दिवशी ६ हजार ४२२ कोरोना रुग्ण आढळले होते.

रुग्णसंख्येमध्ये १२३ रुग्णांची घट झाली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या ४६ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर देशात गेल्या २४ तासांत २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या