26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीय७ गिर्यारोहकाची सुखरूप सुटका

७ गिर्यारोहकाची सुखरूप सुटका

एकमत ऑनलाईन

रुद्रप्रयाग : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारपासून तब्बल ४ हजार ५०० मीटर उंचीवर अडकलेल्या ७ गिर्यारोहकांना आज (सोमवार) सकाळी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित बाहेर काढले. गिर्यारोहकांच्या या गटाने शुक्रवारी संध्याकाळी स्थानिक प्रशासनाला संदेश पाठवला होता आणि ते स्वत:हून माघारी येण्यास असमर्थ आहेत, असे म्हटले होते. शिवाय त्यांच्याजवळचे अन्न आणि पाणीदेखील संपले आहे. त्यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या २ हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या