26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयहरियाणात गणपती विसर्जनावेळी ७ बुडाले

हरियाणात गणपती विसर्जनावेळी ७ बुडाले

एकमत ऑनलाईन

चंदीगड : हरियाणात गणपतीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. हरियाणात गणपतीचे विसर्जन करताना ७ जणांचा बुडून मृत्यू झाला. सोनीपतमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला, तर महेंद्रगडमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाला.

सोनपतमधील मिमारपूर घाटावर एक व्यक्ती आपला मुलगा आणि पुतण्यासोबत गणपतीच्या विसर्जनासाठी गेला होता. या लोकांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महेंद्रगडमधील कनिना-रेवाडी मार्गावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले सुमारे नऊ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा आठ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या