कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोरेरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात ७ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऑटोचालक ८ मुलांना शाळेत घेऊन जात असताना एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला. सर्व मुले ५ ते ८ वयोगटातील होती. २ मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर कोरेर रुग्णालयात ५ मुलांचा मृत्यू झाला. चालक आणि एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.