25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयतलावात बुडून ७ तरुणांचा मृत्यू

तलावात बुडून ७ तरुणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील गोविंदसागर तलावात सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी मोठी दुर्घटना घडली. येथील तलावात बुडून ७ तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या कोलका बाबा गरीब दास मंदिराजवळ घडली.

सर्व मृत पंजाबमधील मोहाली येथील रहिवासी आहेत. यातील चार अल्पवयीन आहेत, तर दोन तरुण एकाच कुटुंबातील आहेत. पवन कुमार (३५), रमन कुमार (१९), लाभ सिंग(१७), लखवीर सिंग(१६), अरुण(१४), विशाल (१८) व शिवा (१६) अशी मृतांची नावे आहेत. रमण कुमार आणि लाभ सिंग हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या