लालूप्रसादांच्या निकटवर्तीयांवर कारवाई
पाटणा : जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा यांच्या लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने २४ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत ईडीने ७० लाख रुपयांची रक्कम, दीड किलो तोळे सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केले आहे.
ईडीने काल पाटणा, रांची, मुंबई, बिहार आणि दिल्लीसह २४ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुली रागिनी, चंदा, हेमा यादव आणि तेजस्वी यादव यांच्या घरांचा समावेश आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांच्या जवळील समजले जाणारे राजदचे आमदार अबू दोजाना यांच्याही घरी ईडीने छापेमारी केली.