28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयदेशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील

देशात ७१ टक्के नवे रुग्ण १० राज्यांतील

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात थैमान घातले आहे. एकीकडे रोज देशात ४ लाखांवर नवे रुग्ण सापडत आहेत, तर कोरोनावर मात करणा-या रुग्णांचे प्रमाणही आता वाढत आहे. देशात रुग्णवाढीची चिंता वाढलेली असली, तरी तब्बल ७१ टक्के नवे रुग्ण केवळ १० राज्यांत आढळत आहेत. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

देशात आज गेल्या २४ तासांत ४ लाख ३ हजार ७३८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३ लाख ८६ हजार ४४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर सलग दुस-या दिवशी ४ हजारांवर म्हणजे ४ हजार ९२ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटी २२ लाख ९६ हजारांवर गेली असून, यापैकी १ कोटी ८३ लाख १७ हजारांवर रुग्ण बरे झाले आहेत. यात २ लाख ४२ हजार ३६२ जणांचा मृत्यू झाला. यात कोरोनावर मात करणा-यांचे प्रमाण ८२.१५ टक्के नोंदले गेले, तर मृत्यू दर १.०९ टक्के आहे.

विशेष म्हणजे देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांमधील ७१.७५ टक्के रुग्ण केवळ १० राज्यांत सापडले आहेत. यात महाराष्ट्र आघाडीवर असून, कर्नाटक, नवी दिल्लीसह केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा आदी राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक ५६ हजारांवर रुग्ण महाराष्ट्रात, तर ४७ हजारांवर रुग्ण कर्नाटकात सापडले आहेत.

मृत्यूच्या राष्ट्रीय दरात घट
गेल्या २४ तासांत तीन राज्यांत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि लक्षद्वीपचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूच्या राष्ट्रीय दरात घट होऊन सध्याचा मृत्यूदर १.०९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. २४ तासांत ४ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील ७४ टक्के रुग्णांचा मृत्यू १० राज्यांत झाला. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र, कर्नाटकात झाले.

आता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या