23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीय  देशात गेल्या २४ तासांत ७,२४० नवे रुग्ण; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

  देशात गेल्या २४ तासांत ७,२४० नवे रुग्ण; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. गेल्या २४ तासांत ७,२४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३२ हजार ४९० वर पोहोचली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७,२४० नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार ४९० झाली आहे. त्यापैकी २,७०१ रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वांत मोठी वाढ आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी तब्बल ९३ दिवसांनंतर एका दिवसात देशात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज गुरुवारी हा आकडा सात हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात एकाच दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ
राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला ८००-९०० असे आढळणारे रुग्ण आता हजाराच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे.

तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्यात तब्बल २ हजार ७०१ रुग्ण आढळून आले आहेत तर मुंबईत १,७६५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

मुंबईकरांना धोका वाढला; बुधवारी १,७६५ रुग्णांची वाढ

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत १,७६५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी ८३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील २४ तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी ७३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८६६ झाला आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये ७००० सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात १,४८२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात ६५० सक्रिय रुग्ण आहेत. अहमदनगर १३, रायगड २५३, पालघर १८१, रत्नागिरी १७, सिंधुदुर्ग १०, नागपूर ५८, चंद्रपूर ११, वाशिम १३, औरंगाबाद ११ आणि नाशिकमध्ये ३५ सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १० पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण २,७०१ सक्रिय रुग्ण आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या