24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयगोव्यात चार दिवसांत ७४ रुग्णांचा मृत्यू

गोव्यात चार दिवसांत ७४ रुग्णांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने गोव्यातील या रुग्णालयात गेल्या चार दिवसांत ७४ लोकांनी आपला जीव गमावला असून, प्रशासन मात्र रुग्ण मोजणीसंदर्भातील गोंधळ असल्याचा दावा करत आरोप-प्रत्यारोप करत आहे. गोव्यातील या रुग्णालयात मंगळवारी रात्रीपासून परिस्थिती भीषण झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी २६, बुधवारी २० आणि गुरुवारी १५ रुग्णांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल हे राज्यातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय आहे.

इस्रायलने गाझा सीमेवर पाठवले सैन्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या