37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय७५ वा स्वातंत्र्यदिन होणार भव्यदिव्य

७५ वा स्वातंत्र्यदिन होणार भव्यदिव्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन भव्य पद्धतीने साजरा करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत २५९ सभासदांचा समावेश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. प्राप्त माहितीनुसार या स्वातंर्त्योत्सव आयोजन समितीची पहिली बैठक ८ मार्चला होणार आहे.

समितीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. १२ मार्चपासून सुरू होवून ७५ आठवड्यांपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल. या समितीत सर्व राज्यपाल, २८ मुख्यमंत्री, प्रसिद्ध कलाकार, क्रीडापटू आणि साहित्यिकांचा समावेश असून यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे.

याशिवाय योगगुरू बाबा रामदेव हे देखील समितीचे सदस्य आहेत. राष्ट्रीय समितीत सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांचा समावेश आहे. ही समिती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम तयार करण्यासाठी धोरणात्मक दिशानिर्देश आणि मार्गदर्शक सूचना प्रदान करेल. हा सोहळा १५ ऑगस्ट, २०२२ रोजी म्हणजेच, १२ मार्च, २०२१ पासून ७५ आठवड्यांनंतर होण्याचा प्रस्ताव आहे. १२ मार्च २०२१ ला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचा ९१वा वर्धापन दिन आहे.

लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या