24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाच्या दुस-या लाटेत ७७६ डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनाच्या दुस-या लाटेत ७७६ डॉक्टरांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : क ोरोनाच्या दुस-या लाटेने देशाला हादरवून सोडले. पहिल्या लाटेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण दुस-या लाटेत आढळले. तसेच मृत्यूंची संख्या देखील सर्वाधिक होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, दुस-या लाटेत बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. यानंतर राजधानी दिल्ली दुस-या क्रमांकावर आहे. देशात एकून ७७६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत १०९ यानंतर उत्तर प्रदेशात ७९, पश्चिम बंगालमध्ये ६२, तामिळनाडूमध्ये ५०, आंध्र प्रदेशात ४०, आसाममध्ये १०, गुजरातमध्ये ३९ आणि झारखंडमध्ये ३९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. याशिवाय मध्य प्रदेशात १६, महाराष्ट्रात २३, ओडिशामध्ये ३४, राजस्थानमध्ये ४४ आणि तेलंगणामध्ये ३७ डॉक्टरांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१.६६७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

डेल्टा व्हेरिएंट विक्राळ रूप धारण करतोय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या