21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीय७८ यूट्यूब न्यूज चॅनल, सोशल मीडियावर बंदी

७८ यूट्यूब न्यूज चॅनल, सोशल मीडियावर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई करताना सरकारने ७८ यूट्यूब न्यूज चॅनेल आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला ब्लाक केले आहे. सूचना प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी याची माहिती दिली आहे. या ७८ यूट्यूब न्यूज चॅनेलवर तसेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

७८ यूट्यूब न्यूज आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील कारवाई ही आयटी अ‍ॅक्ट २००० च्या कलम ६९ अ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केली आहे. सिंह यांच्या माहितीनुसार, सरकारने गेल्या २ वर्षात ५६० यूट्यूब यूआरएलला ब्लॉक केलेले आहे. ब्लॉक करण्यात आलेले यूट्यूब न्यूज चॅनेलवर व् ूअर्सची संख्या ६८ कोटीहून जास्त होती. सूचना प्रसारण मंत्री यांनी मंगळवारी लोकसभेत एक लिखित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. खरं, म्हणजे तामिळनाडूच्या विरुधुनगरचे काँग्रेस खासदार मनिकम टॅगोर बी यांनी सरकारकडून बंद करण्यात आलेल्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या संख्येची माहिती मागितली होती.

सूचना आणि प्रसारण मंत्रालयकडून याआधीही अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला १६ यूट्यूब न्यूज चॅनेलला बंद करण्यात आले होते. यात १० भारतीय चॅनेल आणि पाकिस्तानमधून ऑपरेट करण्यात येणारे ६ यूट्यूब चॅनेलला भारताच्या नॅशनल सिक्योरिटी आणि सार्वजनिक व्यवस्थेत भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोपाखाली ब्लॉक करण्यात आले होते. आयटी अ‍ॅक्ट २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

५ एप्रिलला झाली होती कारवाई
सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने यावर्षी ५ एप्रिलला आयटी अ‍ॅक्ट २०२१ अंतर्गत इमरजन्सी पॉवरचा वापर करून कारवाई केली होती. या कारवाईत २२ यूट्यूब न्यूज चॅनेल, तीन ट्विटर अकाउंट आणि एक फेसबुक अकाउंट सोबत एक न्यूज वेबसाइटला बंद केले होते. या चॅनेलवरील पाहणा-यांची संख्या २५० कोटीहून जास्त होती. या चॅनेलवर भारतीय लष्कर आणि भारताचे विदेश संबंधासारख्या विषयावर चुकीची आणि भ्रमित करणारी माहिती पसरवली जात होती.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या