22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये शिक्षकांना ७ वे वेतन आयोग

पंजाबमध्ये शिक्षकांना ७ वे वेतन आयोग

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.

एका व्हीडीओ संदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची घोषणा केली. १ ऑक्टोबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सीएम मान यांनी लवकरच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापकांची भरती केली जाईल अशी घोषणाही मान यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या