31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम आठ बँकांना ४,८३७ कोटींचा गंडा; कंपनीविरुद्ध गुन्हा; सीबीआयकडून कारवाई

आठ बँकांना ४,८३७ कोटींचा गंडा; कंपनीविरुद्ध गुन्हा; सीबीआयकडून कारवाई

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत तक्रार दाखल केली होती. सीबीआयने आयव्हीआरसीएल कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई.सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर.बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आयव्हीआरसीएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी असून गेल्या २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रेडिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली,असा आरोप स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या तक्रारीत केला आह. आरोपींबरोबर काही अज्ञात सरकारी कर्मचारीही या फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचेही स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. फसवणूक केलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. सर्व बँकांना मिळून ४,८३७ कोटींची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.जी.कौर यांनी दिली आहे.

लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून गैरव्यवहार
कंपनीने लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून संबंधित लोकांना पैसे दिले. यावेळी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला,असे तक्रारीत म्हटले आहे.सीबीआयकडून बुधवारी यासंबंधी आरोपींच्या कार्यालय आणि घरांवर छापे टाकून काही कागदपत्रेही जप्त केली आहेत.

नव्या कोरोनाचे दिल्लीत ४ रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या