23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयडबल डेकर बसच्या भीषण अपघातात ८ ठार

डबल डेकर बसच्या भीषण अपघातात ८ ठार

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला. यामध्ये अपघातग्रस्त डबल डेकर बस हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुस-या डबल डेकर बसवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या बसचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

पोलिस अधिकारी मनोज पांडे म्हणाले, अपघातग्रस्त बस ही बिहारमधील सीतामढी येथून आली होती. जी नरेंद्रपूर मद्रहा गावाजवळ हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुस-या एका बसवर जाऊन आदळली. यामध्ये ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तर जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर जे गंभीर आहेत त्यांना लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या