25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउद्योगजगतदेशात लवकरच सुरू होणार ८ नव्या बँका

देशात लवकरच सुरू होणार ८ नव्या बँका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचावी यासाठी गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, खासगी कंपन्या यांनाही या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम, ग्रामीण भागात सेवा देणा-या कंपन्यांना बँकिंग यंत्रणा उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेने स्वीकारले आहे. यामुळे अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकिंग क्षेत्रात अनेक खासगी कंपन्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये उज्जीवन, जनलक्ष्मी, इक्विटास, उत्कर्ष, सूर्योदय, कॅपिटल अशी कितीतरी नावे सांगता येतील.

अगदी सूक्ष्म, लघू उद्योगांना कर्ज पुरवठा व्हावा, अल्प उत्पन्न असणा-या लोकांना बँंिकग सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी छोट्या स्वरूपातील बँकांचे जाळे उभारण्यावर भर दिला जात आहे. युनिव्हर्सल बँक या प्रकाराअंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा देणा-या मोठ्या आकाराच्या बँकांचा समावेश होतो. सध्या युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँक अशा दोन्ही प्रकारातील बँका सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या पुढाकार घेत आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवान्यासाठी कधीही अर्ज करण्याची ऑन टॅप नावाची सुविधा सुरू केली असून, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना १ ऑगस्ट २०१६ आणि ५ डिसेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत नुकतेच बँकेकडे आठ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये चार अर्ज युनिव्हर्सल बँक प्रकारासाठी तर चार अर्ज स्मॉल फायनान्स बँकेसाठी आहेत.

युनिव्हर्सल बँक
यूएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, द रिपेट्रीएटस कोऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक लि., चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड, पंकज वैश्य आदी कंपन्यांनी युनिव्हर्सल बँकेच्या परवान्यासाठी ऑन टॅप परवाना सुविधेअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.

स्मॉल फायनान्स बँक
स्मॉल फायनान्स बँकेसाठी व्हिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅलिकट सिटी सर्व्हिस कोऑपरेटिव बँक लि., अखिल कुमार गुप्ता आणि क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आदी कंपन्यांनी अर्ज केला आहे.

 

कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत करा; अदर पुनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या