22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयझाशीत ८ विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा

झाशीत ८ विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा

एकमत ऑनलाईन

झाशी : झाशी न्यायालयाने ८ विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व विद्यार्थी शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकत असून त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या वसतिगृहासमोरून जाणा-या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.

न्यायालयाने या मुलांना दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने प्रत्येक दोषीला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील निम्मी रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. विशेष सरकारी वकील विजय कुमार कुशवाह या प्रकरणाची सुरुवातीपासूनच चौकशी करत आहेत. कुशवाह म्हणाले, आठही आरोपी या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. या सर्वांवर पॉक्सो कायद्याच्या कलम ५/६, ९/१० सह ११ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.

या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये महोबाचा मुख्य आरोपी रोहित सैनी, भारत कुमार, संजय कुशवाह, धर्मेंद्र सेन, मोनू पर्या आणि झाशीचे मयंक शिवहरे, गोंडाचे शैलेंद्र नाथ पाठक व प्रयागराजचा विपिन तिवारी यांचा समावेश आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या