22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयड्रग्जचा पुरवठा करणा-या ८ तरुणांना अटक

ड्रग्जचा पुरवठा करणा-या ८ तरुणांना अटक

एकमत ऑनलाईन

दिल्ली : तरुणांमध्ये ड्रग्जची वाढती क्रेझ पाहता देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने छापा टाकून ड्रग्जसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८ तरुणांना पकडले असून यात बीबीए, एमबीए, आयआयएम, बीटेक आणि फॅशन डिझायनर ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हे लोक एका ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवायचे. आरोपी विद्यार्थी शाळा, महाविद्यालये, संस्था, व्यवस्थापन महाविद्यालये यांना लक्ष्य करत तिथे शिकणा-या मुलांना अंमली पदार्थांची सवय लावायचे. त्यासाठी वेगवेगळ्या कुरिअरद्वारे पुरवठा केला जात होता. दिल्ली पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने ड्रग्जशी संबंधित या औषधांचा खुलासा करून एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या