30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय देशात ८० टक्के लोक मास्क विना

देशात ८० टक्के लोक मास्क विना

जनतेकडून दुर्लक्ष ; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. मात्र, जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. सुमारे ८० टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे, हे चिंताजनक असल्याचे सांगत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

गुजरातच्या राजकोटमध्ये कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबतही न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राजकोटमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर केंद्रीय गृह सचिव देशभरातील सरकारी रुग्णालयातील अग्निसुरक्षेबाबत बैठक घेतील आणि योग्य निर्देश देतील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

मोर्च, मिरवणुका काढणे गंभीर
देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून जनतेमध्ये याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी मोर्चे, मिरवणूका काढण्यात येत आहेत. तर सुमारे ८० टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. जे मास्क वापरतात, ते त्यांच्या गळयाभोवतीच लपेटलेले असतात. जनतेने योग्य प्रकारे मास्क वापरावेत. तसेच कोरोना रोखण्याबाबत सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली.

संकटाच्या काळात राजकारण नको
१० राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने फैलावत असून ७७ टक्के रुग्ण या राज्यातील असल्याचे केंद्राने सांगितले. त्यावर न्यायालयाने कोरोनाबाबतच्या नियमावलीची कठोरतेने अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच कोरोना रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगत या संकटाच्या काळात राजकारण करू नये. एकत्र येत या संकटाचा मुकाबला करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे.

कंगनावरील कारवाई नियमानुसारचं

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या