23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीय८० हजार कर्मचा-यांनी सोडले इन्फोसिस

८० हजार कर्मचा-यांनी सोडले इन्फोसिस

एकमत ऑनलाईन

मुंबई : इन्फोसिस कर्मचा-यांची देशातील दुसरी सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी आहे. पण सध्या इन्फोसिस सोडणा-या कर्मचा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिमाहीचे निकालाचे आकडे बघितले तर त्यात कमालीची वाढ झाल्याचे लक्षात येईल.

कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च २०२२ च्या तिमाहीत २७.७ टक्के कर्मचा-यांनी नोकरी सोडली. इन्फोसिस ने २०२१-२२ मध्ये जागतिक स्तरावर ८५,००० फ्रेशर्सना रोजगार दिला. कंपनी चालू आर्थिक वर्षात ५०,००० नवीन लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे. मार्च तिमाहीत कंपनी सोडलेल्यांची टक्केवारी २७.७ टक्के होती. आयटी उद्योगातील टॅलेंटची वाढती मागणी आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे कंपनी सोडणा-या लोकांची टक्केवारी जास्त आहे.

कंपनीला १२ टक्के नफा
गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा १२ टक्क्यांनी वाढून ५६८६ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे.

रशियातील व्यवसाय बंद
कंपनीने म्हटले आहे की, ती रशियातील आपले युनिट बंद करून बाहेर पडणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियातून बाहेर पडणा-या कंपन्यांच्या यादीत इन्फोसिसचा समावेश झाला आहे. इन्फोसिसने सांगितले की, ते सध्या रशियामधील त्यांच्या ग्राहकांसोबत कोणताही व्यवसाय करत नाहीत आणि भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्याचे कोणतेही नियोजन नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या