25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीय८१ टक्के रुग्ण १० राज्यांतील; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

८१ टक्के रुग्ण १० राज्यांतील; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत समोर आलेल्या रुग्णांत ८१ टक्के रुग्ण केवळ १० राज्यांतच नोंदवले गेले आहेत, धक्कादायक बाब म्हणजे यातील तब्बल ५१ हजार ७५१ नवे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, देशात १६ राज्यांत झपाट्याने रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशातील ज्या १६ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगणा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत ८८ टक्के रुग्ण या १० राज्यांतील आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.

भारतात एकूण १२ लाख ६४ हजार ६९८ सक्रीय रुग्णांपैकी ६९ टक्के रुग्ण केवळ पाच राज्यांतील आहेत, यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण, मृतांची संख्या आणि सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. यानंतर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. याच तीन राज्यांत कोराना अत्यंत वेगाने हातपाय पसरत आहे.

४४.७८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात
देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ४४.७८ टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत, तर छत्तीसगडमध्ये ७.८२ टक्के, उत्तर प्रदेशात ६.४५ टक्के, कर्नाटकमध्ये ६.०१ टक्के, केरळमध्ये ३.७९ टक्के सक्रीय रुग्ण आहेत, तर ३१.१५ टक्के सक्रीय रुग्ण हे देशातील इतर राज्यांत आहेत.

राज्यात २४ तासांत आढळले ६०,२१२ रुग्ण; २८१ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या